भुसावळ- पांडुरंग टॉकीजजवळ उभ्या असलेल्या वृद्धाच्या खिशातून रोकड लांबवून पळ काढणार्या भामट्यास जमावाने पाठलाग करून पकडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. मुक्ताईनगर तालुक्यातील मन्यारखेडा येथील रहिवासी तथा माजी पोलिस पाटील माधवराव भगू पाटील हे पांडुरंग टॉकीजजवळ गाडीची वाट पाहत असताना संशयीत सईद पटेल याने त्यांच्या खिशातील दोन हजार 250 रुपयांची रक्कम लांबवत पळ काढला तर याचवेळी पाटील यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केल्याने जमावाने संशयीतांचा पाठलाग करून त्यास बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळ पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. रात्री उशिरापर्यंत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.