वृद्धापकाळात चित्त स्थिर व मनस्थिती दृढ ठेवण्याची आवश्यकता

0

सावदा । वृद्धपकाळात आपले मन चित्त स्थिर ठेवा व मन कधीही दृढ ठेवा चिंता करू नका प्रसन्न रहा असे प्रतिपादन जर्नादन हरिजी महाराज यांनी केले. दृष्टी मेमोरियल ट्रस्टतर्फे आयोजित जेष्ठ नागरिकांचे सत्कार सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शास्त्री भक्तीप्रकाशदास, सोमवारगिरी मठीचे महंत कृष्णगीरीजी महाराज, कोचुर येथील नारायणगीरी महाराज, शास्त्री भक्तीस्वरूपदास, आमदार हरिभाऊ जावळे, कथाकथनकार प्रा. व.पु. होले, निसर्ग उपचारतज्ञ आर.डी. महाजन, सेवानिवृत्त सहाय्यक कमिशनर अरविंद ठोंगे, नगराध्यक्षा अनिता येवले, उपनगराध्यक्षा नंदा लोखंडे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी, राजेश वानखेडे, नगरसेविका जयश्री नेहेते, शबाना तडवी, लीना चौधरी उपस्थित होते.

संस्कृती जोपासल्यास वृध्दाश्रमांची गरज उरणार नाही
शास्त्री भक्तीप्रकाशदास यांनी देखील आपण आता वृद्धपकाळात असून घरात आपले वर्तन त्याप्रमाणे श्रेष्ठ असावे जर आपण घरात बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो ची भूमिका घेतली तर घरात कधीही भांडणे होणार नाही व आपण जर आपली संस्कृती जपली तर देशात वृद्धाश्रमाची देखील गरज उरणार नाही असे प्रतिपादन यावेळी केले. सकाळ सत्रात कथाकथनकार प्रा. व.पु. होले यांचे सेवा निवृत्तीनंतरचे जीवन या विषयावर व्याख्यान दिले.

नैसर्गिक आहार घ्या
निसर्गउपचारतज्ञ आर.डी. महाजन यांनी जेष्ठाचे आपले आरोग्य सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करताना दररोज व्यायाम करा, नैसर्गिक आहार घ्या असा सल्ला दिला. सूत्रसंचालन नंदकिशोर पाटील व संजय महाजन यांनी केले. यशस्वितेसाठी दृष्टी मेमोरियल ट्रस्ट अशोक परदेशी, किशोर परदेशी, संतोष परदेशी, सदस्य तसेच पंकज पाटील, संजय चौधरी विनोद कोळी यांनी परिश्रम घेतले.