वृद्धाला धुम स्टाईलने लुटण्याचा प्रयत्न फसला

0

चाळीसगाव । येथील आयसीआयसीआय बँकेतुन वृद्धाने दिड लाख रुपये काढलेली रक्कम आज 8 मार्च रोजी दुपारी 1.15 वाजेच्या सुमारास धूम स्टाईलने दोघां मोटारसायकल स्वारांनी मुख्य पोस्ट ऑफिस समोर लुटण्याचा प्रयत्न केला मात्र वृद्धाच्या सतर्कतेने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला आहे. तालुक्यातील बोढरे येथील उत्तम सुकलाल राठोड यांनी दिनांक 8 मार्च रोजी पोलीस स्टेशनच्या बाजुला असलेल्या आय सी आय सी आय बँकेतुन दिड लाख रुपये काढले ते प्लास्टीक च्या पिशवीत रक्कम घेवुन जात असतानाच जवळच असलेल्या मुख्य पोस्ट ऑफिस समोरील विशाल ड्रेसेस जवळ दुपारी 1.15 वाजेच्या सुमारास मोटारसायकलवर दोघे चोरटे धुम स्टाईलने आले व एकाने वृद्धाच्या हातातुन पैशांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पिशवी सोडली नाही. यावेळी वृद्ध व चोरट्यांमध्ये झटापटी देखील झाली हा प्रकार लोकांना समजल्यानंतर चोरट्यांनी तेथुन मोटारसायकलसह पलायन केले.