वृद्ध भिकारी महिलेशी अश्‍लील चाळे करणारा अटकेत

0

पिंपरी-चिंचवड : रस्त्याकडेला झोपलेल्या एका 65 वर्षीय वृद्ध भिकारी महिलेशी अश्‍लील चाळे करणार्‍या तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 7) रात्री अकराच्या सुमारास भोसरी येथे घडला. भोसरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास भोसरी येथे 65 वर्षीय बेवारस वृद्ध भिकारी महिला रस्त्याच्या बाजूला झोपली होती. त्यावेळी 24 वर्षीय तरुण रस्त्याने जात होता. त्याने झोपलेल्या महिलेशी अश्‍लील वर्तन केले. त्यामुळे महिलेने आरडाओरडा केला. तरुणाने नागरिकांच्या भीतीपोटी महिलेच्या डोक्यात दगड मारला. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. महिलेला मारहाण करून तरुण पळून जाऊ लागला, एवढ्यात आसपासच्या नागरिकांनी पाठलाग करून आरोपी तरुणाला पकडले. त्याला चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.