वृध्दाचा रूग्णलयात उपचारादरम्यान मृत्यू

0

जळगाव । जिल्हा रूग्णालयात वेगवेगळ्या घटनेत दोन व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात राहणार्‍या 75 वर्षीय वृध्दाला पोटाचा आजार असल्याने तसेच शिवाजी नगरातील 40 वर्षीय इसमाच्या पायाला सेप्टीक झाल्याने या दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना या दोघांचा मृत्यू झाल्याने या संदर्भात एमआयडीसी व शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अकस्मात मृत्यूची करण्यात आली नोंद
औद्योगिक वसाहत परिसरात राहणारे रघुनाथ सिताराम सोनवणे (75) यांना पोटाचा आजार होता. यावेळी त्यांना 11 जानेवारी रोजी उपचारासाठी सकाळी 10 वाजता दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत औद्योगिक वसाहत पोलिस स्थानकात सीएमओ डॉ. शेख यांच्या खबरेवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एएसआय प्रकाश निंबाळकर करीत आहे. तसेच शिवाजी नगर परिसरात राहणारे भटु मराठे (वय 40) याच्या पायाला सेप्टीक झाले होते. त्यांच्या कुटूंबियांनी उपचारासाठी 5 जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना आज सकाळी 10.40 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सीएमओ डॉ. बीराजदार यांच्या खबरेवरुन शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली .