पिंपरी-चिंचवड : शहरात सोमवारी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघा जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. काळेवाडी येथे एका 25 वर्षाच्या विवाहितेने तर भोसरी येथे व भोसरी येथे 30 वर्षाच्या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
काळेवाडीत विवाहितेचा गळफास
काळेवाडी येथे अश्विनी राहुल रणसिंग (वय 25 रा श्रीकृष्ण कॉलनी, काळेवाडी) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. अश्विनी हिने राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी यांचे पती राहुल हे एका खासगी गाडीवर चालक म्हणून काम करतात. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले. त्यानंतर दुपारी ते जेवणासाठी घऱी आले असता त्यांना घराचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी आवाज दिला मात्र घरातून काही प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता हा प्रकार उघडकीस आला. अश्विनी यांनी घरातील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
भोसरीत तरुणाने पंख्याला लटकावले
भोसरीमध्ये परेश महेश्वर बेहेरा (वय 30 रा. फुगे चाळ, खंडोबामाळ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चाळ मालक निवृत्ती भगवान फुगे (वय 50) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुगे हे त्यांच्या पत्नीसह भोसरी येथे राहतात. परेश याची पत्नी गावाला गेली आहे. आज दुपारी चार वाजले तरी घराचा दरवाजा का उघडला जात नाही म्हणून निवृत्ती फुगे यांनी परेश यांना आवाज दिला. बराचवेळ आतून काहीच प्रतिसाद न आल्याने दरवाजा तोडण्यात आला. यावेळी परेश याने घरातील पंख्याला साडीच्या सहायाने गळफास घेतल्याचे उघड झाले.