भुसावळ। येथील वेडीमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या कार्याची दखल घेत जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे नुकत्याच झालेल्या 39व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वेडीमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. वेडीमाता ज्येष्ठ नागरीक संघ हा नोंदणीकृत असून सामाजिक, आरोग्यदायी, शैक्षणिक, पर्यावरण, स्वच्छता अशा विविध क्षेत्रात मोलाचे कार्य करीत आहे.
उत्कृष्ट कार्याची घेतली दखल
शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रमदेखील या संघातर्फे राबविण्यात येतात. संघाने 50 ज्येष्ठ नागरिकांना मुंबई ते दिल्ली विमान प्रवासाचा आनंदही मिळवून दिला. तसेच सागरी प्रवासासह इतर कार्यक्रमांचेही नियोजन करीत असतात. या कार्यक्रमाचा आढावा घेवून बँकेने वेडीमाता ज्येष्ठ नागरीक संघाचा सत्कार केला. अध्यक्ष राव यांच्या हस्ते सत्कार झाला. याप्रसंगी ज्येष्ठ नागरीक संघाचे पदाधिकारी दत्तात्रय ढाके, सिताराम भंगाळे, मेघश्याम फालक, सुपडू भारंबे, सुधाकर चौधरी, शिवाजी वाढे, भागवत सपकाळे उपस्थित होते.