राजगुरुनगर :- वेताळे (ता.खेड) या गावाला सन 2016-17 मधील जिल्हा परीषदेच्या कृषी विभागाचा आदर्श शरद कृषीग्राम पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी सभापती सुजाता पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, कृषी अधिकारी सुनील खैरनार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेताळे गावात शेतीसंदर्भात विविध योजना राबवून शेतकर्यांचा आर्थिकस्तर उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून विविध शासनाच्या योजना राबविण्यात आल्या होत्या. याची दखल घेत वेताळे गावाला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायतीचे सरपंच बंडोपंत बोंबले, उपसरपंच संध्या सांडभोर, ग्रामसेविका पुनम चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला.