वेदांत भामरेची नवोदय विद्यालयासाठी निवड

0

शहादा । येथील वेदांत दयानंद भामरे या विद्यार्थ्यांची जवाहरलाल नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. दरवर्षी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची जवाहरलाल नवोदय विद्यालयासाठी निवड प्रकीया पुर्व परिक्षा घेऊन तालुका स्तरावर परिक्षा घेण्यात येते. त्या मधुन चाळीस विद्यार्थीची निवड होते.त्यात वेदांत दयानंद भामरे हा चावरा इंग्रजी मेडीयम स्कुलचा विद्यार्थी असुन विज वितरण कंपनीचे प्रधान तंत्रज्ञ दयानंद अनंत भामरे यांचा मुलगा आहे.तो जिल्ह्यात तिसरा आला आहे. त्याच्या यशाबद्दल शाळेचे मुख्यधयापक व शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.