वेरुळला विश्वकर्मा पुजनासाठी जाणार समाजबांधव

0

भुसावळ । शहरातील लक्ष्मी नारायण नगरातील विश्वकर्मा मंदिरात विश्वकर्मा सुतार समाज व विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येवून 9 सप्टेंबर रोजी वेरुळ येथे आयोजित करण्यात आलेल्या विश्वकर्मा पुजन कार्यक्रमात जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी एरंडोलचे परमार गुरुजी हे होते.

पदाधिकार्‍यांनी केले समाजबांधवांना मार्गदर्शन
सुरुवातीस भगवान विश्वकर्मा यांचे पुजन करण्यात येवून बैठकीस सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविकात संजय अंदुरकर यांनी संघटनेचे कामकाज व बैठकीमागचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते एम.टी. रुल्हे, जिल्हा संघटक संजय दिक्षीत, जिल्हा अध्यक्ष योगेश हिरोळकर, विश्वकर्मा सुतार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र दांडगे, मुक्ताईनगरचे भास्कर जंजाळकर, यावलचे चेतन अढळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

बैठकीस यांची होती उपस्थिती
अध्यक्षीय मार्गदर्शनात परमार गुरुजी यांनी समाजाच्या न्याय हक्कासाठी जाती-पोट जातींना थारा न देता सर्व विश्वकर्मा वंशियांनी एकत्र येत लढा देण्यची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी कीरण मिस्तरी यांची निवड करण्यात आली. सुत्रसंचालन प्रदीप अहिरे यांनी केले. प्रसंगी प्रवीण वडस्कर, दत्तु सुर्यवंशी, गोपाळ जाधव, विनायक दांडगे, संतोष दांडगे, अशोक रुल्हे, दत्तात्रय खैरनार, विकास चव्हाण, विशाल बोरवनकर, अरुण जाधव, सचिन मिस्तरी, प्रशांत इंगळे, रघु अढळकर, बाळु आहेरेकर, योगेश वाघ, प्रवीण बुंदले, संजय हिरे, सुनील जाधव यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.