वेल्हाळे अ‍ॅशबंडात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून चालकाचा मृत्यू

0

वरणगाव- वेल्हाळा येथील राखेच्या बंडात ट्रॅक्टर पलटी होऊन चालक ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मुकेश पावरा (वय 27, रा.धोपी, जि.खरगोन, ह.मु.विल्हाळा) असे मयताचे नाव आहे. पावरा हे नवीन राखेच्या बंडाजवळ परीवारासोबत वास्तव्यास होते. शनिवारी मुकेश राखेचे ट्रॅक्टर भरण्यासाठी अ‍ॅश बंडमध्ये गेले असता दुपारी पाच वाजेच्या सुमारास रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांचे ट्रॅक्टर अ‍ॅश बंडमध्ये पलटी झाले. या अपघातात चालक मुकेश पावरा यांचा जागीच मृत्यू झाला.