वेस्टइंडिजला व्हाइटवॉश

0

हेमिल्टन । न्यूझीलड क्रिकेट टीमने मंगळवारी दुसर्‍या कसोटी सामन्यात वेस्टइंडिजला 240 धावांनी पराभूत केले. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 2-0 ने निर्भेळ यश मिळवले. सेडन पार्क येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने वेस्टइंडिजला दुसर्‍या डावात 444 धावाचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्टइंडिजचा संघ अवघ्या 203 धावांपर्यंत मजल मारू शकला. या विजयात न्यूझीलंडकडून नील वागनरने (3/42) महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

वेस्टइंडिजचा डाव 203 धावांतच आटोपला
न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्टइंडिजने सोमवारी दोन विकेटच्या मोबादल्यात 30 धावा केल्या होत्या. त्यानंतर मंगलवारी लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्टइंडिजचा संघ अवघ्या 203 धावापर्यंत मजल मारु शकला.वेस्टइंडिजकडून दुसर्‍या डावात रोस्टन चेस (64) सर्वाधिक धावा फटकावल्या. न्यूझीलंडकडून वागनेरव्यतिरिक्त टीम साउथी, ट्रेंट बाउल्ट आणि मिशेल सेंटनर यांनी प्रत्येकी दोन खेळांडूना माघारी धाडले. दुसर्‍या डावात नाबाद शतक झळकावणारा टेलरला (नाबाद 107) मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.