वेस्ट इंडिजचा ‘वजनदार’ क्रिकेटर आला प्रसिद्धीच्या झोतात

0

नवी दिल्ली – वेस्टइंडीजच्या संघातील एक युवा क्रिकेटपटू सध्या खूप चर्चेत आहे. हा खेळाडू त्याच्या खेळासाठी कमी आणि त्याच्या वजनदार शरीरयष्टीमुळे अधिक प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. रहकीम कॉर्नवाल असे या खेळाडूचे नाव आहे. रहकीम कॉर्नवालचे तब्बल 140 किलो वजन असून त्याची उंची 5.8 फूट उंच आहे. भीमकाय शरीरयष्टी असलेल्या या युवा क्रिकेटपटूने पहिल्या सराव सामन्यात 59 धावांची खेळी केली आहे. या खेळाडूचा खेळ पाहण्यापेक्षा प्रेक्षकांकडून त्याच्या शरीरयष्टीवरच जास्त लक्ष केंद्रीत होत आहे.

वेस्ट इंडिजने इंग्लडविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये राहकीम कॉर्नवेलला संधी दिली आणि त्याने त्याचे सोने केले. या सामन्यात इंग्लंडचा निसटता विजय झाला असला तरी राहकीमने केलेल्या 59 धावांची खेळी केली. नुसतीच फलंदाजी नाही तर गोलंदाजीतही राहकीमने आपली चमक दाखवली. त्याने 10 ओव्हरमध्ये 39 धावा देऊन एक विकेट घेतली. याआधी कॉर्नवेल ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉटिंगबरोबर कॅरेबिअन प्रिमिअर लीगमध्ये सहभाग घेतला होता. राहकीमने लीवॉर्ड आयलँडविरोधात खेळताना क्रिकेट जगताला आपली ओळख करुन दिली होती. या सामन्यात त्याने 74 धावा ठोकत संघाला एकहाती विजय मिळवून दिला होता.