वेस्ट इंडिजमधील प्रथमश्रेणीत चंद्रपॉल पिता – पुत्राची अर्धशतक कामगिरी

0

जमैका । पिता पुत्र एकाच सामन्यात खेळताता दोन्ही अर्धशतके बारी खेळतात असे फार क्वचितच होते.मात्र असे घडले आहे. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल आणि त्याचा तागेनारायण चंद्रपॉल 20 वर्षाचा मुलगा.या दोघांनी स्थानिक क्रिकेट सामन्यात एकाच संघाकडून खेळताना अर्धशतके ठोकण्याची कामगिरी केली.वेस्ट इंडीजमधील प्रथम श्रेणीच्या सामन्यात चंद्रपॉल पिता-पुत्रांनी ही कामगिरी केली. जमैका वि. गुयाना यांच्यात किंगस्टनच्या सबिना पार्क मैदानावर चारदिवसीय सामना सुरू आहे. यात जमैकाविरुद्ध गुयानाकडून खेळताना शिवनारायण चंद्रपॉल आणि तागेनारायण चंद्रपॉल यांनी अर्धशतके ठोकली.

जमैकाने सर्वबाद 255 धावा काढल्या
जमैकामध्ये सुरू असलेल्या प्रथमश्रेणीचे सामन्यात जमैकाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 255 धावा काढल्या. यानंतर गुयानाकडून तागेनारायण सलामीला खेळण्यास आला. त्याने 135 चेंडूंचा सामना करताना 1 षटकार आणि 5 चौकारांसह 58 धावा काढल्या. दुसरा सलामीवीर हेटमेयरनेही अर्धशतक ठोकताना 74 धावा काढल्या. मधल्या फळीत लिओन जॉन्सन आणि विशाल सिंग अनुक्रमे 1 आणि 5 धावा काढून बाद झाले.विशालसिंग 128 च्या स्कोअरवर बाद झाला. यानंतर पाचव्या क्रमांकावर शिवनारायण चंद्रपॉल खेळण्यास आला. शिवनारायणने आपला मुलगा तागेनारायणसोबत चौथ्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी केली.

तागेनारायण शिवनारायणचा सुपूत्र
तागेनारायाण अर्धशतक काढून बाद झाला. शिवनारायण चंद्रपॉलनेही अर्धशतकी खेळी केली. त्याने 175 चेंडूंचा सामना करताना 4 चौकारांसह 57 धावा काढल्या. शिवनारायण चंद्रपॉलने तळाच्या फलंदाजांसोबत कसेबसे गुयानाला 200 चा टप्पा गाठून दिला. गुयानाचा डाव 262 धावांत आटोपला. शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा 20 वर्षीय तागेनारायण असून, तो प्रथम श्रेणीत गुयाना संघाकडून खेळतो.