वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा

0

मुंबई। 5 एकदिवसीय आणि एक टी-20 सामन्याच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. या दोघांऐवजी रिषभ पंत आणि कुलदीप यादवला स्थान मिळाले आहे. वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळेच राहणार आहे.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार ), शिखर धवन, रिशभ पंत, अजिंक्य रहाणे, एम.एस.धोनी, युवराज सिंग, केदार जाधव, हार्दिक पांड्या, आर.अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, दिनेश कार्तिक.