वेस्ट इंडीजची दमदार कामगिरी; भारतासमोर ३२३ धावांचे मोठे आव्हान

0

गुवाहाटी : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन-डे सामन्यात यजमान भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात रिषभ पंतचे पदार्पण झाले असून त्याला यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने कॅप दिली. प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाने चांगली फलंदाजी केली. शिमरोन हेतमेयर ( 106) आणि कायरेन पॉवेल (51) यांच्या उपयुक्त खेळीला शाय होप्स ( 32) आणि कर्णधार जेसन होल्डर ( 38) यांनी चांगली साथ दिली. विंडीजने सहाच्या सरासरीने धावांचा वेग कायम राखताना 50 षटकांत 8 बाद 322 धावा उभ्या केल्या. 2015 नंतर 17 सामन्यांत विंडीज संघाला प्रथम फलंदाजी करताना तिसऱ्यांदाच तीनशे धावांचा पल्ला ओलांडता आला आहे.