हैदराबाद – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हा सामना होत आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडीजची सुरुवात खराब झाली. २२६ वर ६ अशी सद्य स्थिती वेस्ट इंडीजची आहे. त्यामुळे टीम इंडियाला गोलंदाजीसाठी मैदानावर उतरली आहे. या सामन्याद्वारे शार्दुल ठाकूर आतंरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट संघात एंट्री करत आहे.
एस. अंबरीसच्या रुपाने वेस्ट इंडिजला 5 वा झटका बसला आहे. त्यामुळे अवघ्या 113 धावांवरच वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत परतला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर रविंद्र जडेजाने अंबरीसचा झेल टिपला.
वेस्ट इंडिजचा चौथा फलंदाज श्रीम्रोन हेतमेयर 12 धावांवर बाद झाला आहे. कुलदीप यादवने हेतमेयरला पायचीत बाद केलं. वेस्ट इंडिजची धावसंख्या 92 असताना हेतमेयरच्या रुपाने इंडिजला चौथा धक्का बसला. पण, वेस्ट इंडिजने धावफलकावर आपले शतक झळकावले आहे. 37 षटकात 104 धावा केल्या.
कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी उपहारापर्यंत वेस्ट इंडिजचे 3 गडी बाद झाले आहेत. त्यामुळे उपचारापर्यंत 32 षटकात वेस्ट इंडिजला केवळ 86 धावापर्यंतच मजल मारता आली.
वेस्ट इंडिजला तिसरा धक्का बसला आहे, शाय होपच्या रुपाने भारताला तिसरा गडी बाद करण्यात यश आले. उमेश यादवने होमला 36 धावांवर पायचीत बाद केलं. त्यानंतर वेस्ट इंडिजची धावसंख्या 3 बाद 86 अशी बनली होती.