वेस्ट झोन सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघास रौप्यपदक

0

जळगाव । सॉफ्ट बॉल असोसिएशन ऑफ इंडिया इंदौर यांनी आयोजित केलेल्या पश्‍चिम विभागीय सॉफ्ट बॉल अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या ज्युनिअर मुला व मुलींनी रौप्य पदक प्राप्त केले आहे. अंतिम सामन्यात मध्यप्रदेश संघाकडून मुलांना 5-3 तर मुलींना मध्यप्रदेश सोबत 5-2 होम रनाने हार पत्करावी लागली. संघास ट्रॉफी पार्षद दिपीका नायण, कमलेश नायण, राष्ट्रीय सचिव डॉ. प्रविण अनावकर, कौशल शिवरे, मनोज यादव, यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

संघाच्या या यशाबद्दल राज्य अध्यक्ष गिरीश महाजन, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, डॉ. प्रदीप तळवेकर, प्रशांत जगताप, डॉ. सुरज येलताकेर, एन.डी. पखाले, पी.ई. पाटील, नितीन पाटील यांनी अभिनंदन केले आहे.