वैजाली गावात धोकादायक लोंबकाळणार्‍या विद्युत तारा

0

शहादा । तालुक्यातील वैजाली गावातील लोंबकळणार्‍या जिर्ण तारा धोकादायक ठरत आहेत. एखाद्यावेळी मोठी दुर्घटना घडू शकते. तरी संबंधीत विभागाने गावातील विद्युत जिर्ण लवकर बदलाव्यात अशी मागणी होत आहे. वैजाली परीसराला डांबरखेडा सबस्टेशन वरून विद्युत पुरवठा केला जातो. गावात बर्‍याच भागात जिर्ण तारा लोबकळत आहेत. काही भागात तर जेव्हा पासुन तारा टाकल्या आहेत त्या अद्याप बदललेल्या नाहीत असे बोलले जात आहे. यातच बाकीर बोहरी याच्या घराजवळील खांबा वरील जिर्ण तार आपोआपच तुटुन पडली होती. मात्र विजपुरवठा त्यावेळी बंद होता म्हणून मोठा अनर्थ टळाला. सद्या पावसाचे दिवस आहेत. वारा वादळ सुरू असते म्हणून जिर्ण तारा कधी तुटतील सांगता येत नाही. तसेच या लोेंबकळत असणारी तारांमुळे बिघाड होऊन विज पुरवठा तासंतास बंद राहतो. तसेच गावात सर्व शेतकरी वर्ग असल्याने कापसाचे व्यापारी गावात कापुस घ्यायला येतात. तेव्हा त्याची गाडी गावात घुसण्यासाठी तारा टोकरच्या सहाय्याने वरती कराव्या लागतात.