शहादा । तालुक्यातील वैजाली गावात मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून सार्वजनिक बांधकाम विभागातला सूचना देण्यात आला असूनही दुर्लक्ष होत आहे. तरी संबंधीत अधिकार्यांनी ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी गावातील व परीसरातील वाहन धारकांकडून होत आहे. वैजाली ते कलमाडी रस्त्यावर वैजाली गावातच रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. या खड्डा संदर्भात ग्रामपंचायतीने सामाजिक बांधकाम शहादा यांना सुचित करून सुद्धा सा. बा. विभाग दुर्लक्षीत करत आहे. या रस्त्यावर कलमाडी, बोरद, सोनवल, वाडी पुनर्वसन आदी गावातील वाहनांची दिवस राञ वर्दळ सुरू असते. राञी भारनियमनामुळे विज पुरवठा नसतो गावातील शेतकरी वर्ग रात्र-अपरात्री शेतात जात असतात एक -दोन वेळातर मोटरसाइकल खड्यात जाता जाता वाचल्याच्या घटना घडल्या आहेत. तरी संबंधित विभागाने लक्ष देवून मार्गी लावावी अशी मागणी जोर धरत आहे.