वैज्ञानिक चळवळीतून विज्ञाननिष्ठ विद्यार्थी घडतील- डॉ. नगरकर

0

विवेक व्याख्यानमालेत ‘विज्ञान आणि समाज‘ विषयावर मार्गदर्शन

पिंपरी चिंचवड : शैक्षणिक संस्थांनी शाळेत एक वैज्ञानिक मंडळाची स्थापना करून एक वैज्ञानिक चळवळ उभी करावी. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण होवून त्यातून विज्ञाननिष्ठ विद्यार्थी घडतील. असा विश्‍वास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांनी व्यक्त केला. म्हेत्रे वस्ती चिखली येथील राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्था संचलित विश्‍वरत्न इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने आयोजित विवेक व्याख्यानमालेत विज्ञान आणि समाज या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी नगरकर बोलत होते. प्रसंगी, त्यांना आदर्श शास्त्रज्ञ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी युवा संशोधक अंकिता नगरकर, जलअभ्यासक रामदास जंगम,प्रा.के एस पाटील,अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व्यंकट वाघमोडे,उपाध्यक्ष मोहन देवकाते, राजेंद्र घोडके, अजित घोडके आदी उपस्थित होते.

प्रत्येक कृती विज्ञानाशी संबंधित 
डॉ. नगरकर पुढे म्हणाले की, दैनंदिन जिवनात वावरताना प्रत्येक कृती हि विज्ञानाशी संबंधित आहे. सकाळी उठल्यापासून टूथपेस्ट व ब्रश, साबण, मोबाईल, मोटर हि साधणे विज्ञानाचा अविष्कार आहे. यावेळी अंकिताने स्वतःच्या नावावर असलेल्या 10 पेटंटची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष वाघमोडे यांनी केले. सूत्रसंचालन रोहिणी बुरुंगे तर आभार जानवी भोरगिर यांनी मानले.