वैद्यकिय प्रतिनिधींचा राज्यव्यापी संपात सहभाग

0

जळगाव । राज्य विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या जळगाव शाखेतील 600 वैद्यकिय प्रतिनिधी यांनी 13 डिसेंबर रोजी राज्यव्यापी संपात सहभाग नोंदवला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, वैद्यकिय प्रतिनिधींच्या सर्वसाधारण कामाच्या तासाच्या अधिसुचनेत सुधारणे करून ती सलगपणे 10 ते 6 (8 तास) करावेत. विक्री संवर्धन कर्मचारी कायदा अधिनियम 1976 अनुसार फार्म ‘ए’ प्रमाणे औषध कंपन्यांनी नियुक्तीपत्र वैद्यकिय प्रतिनिधींना देणे बंधनकारक करावे व तसे न केल्यास कंपन्या कडक कारवाई करावीत. वैद्यकिय प्रतिनिधींना किमान वेतन 20 हजार रूपये जाहिर करावे, बोनस, पी.एफ, ईएसआयसी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, प्रस्तावित कामगार विरोधी कायदे सुधारण रद्द करावेत. आदी मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत राज्यव्यापी संपात सहभाग जिल्ह्यातील 600 हुन अधिकार वैद्यकिय प्रतिनिधी यांनी नोंदवला आहे.