वैद्यकीय तपासणीसाठी मुलीला नेले रुग्णालयात

0

जळगाव : समतानगरातील 14 वर्षीय मुलीच्या पालकांनी तिचे लग्न लावून देण्याचे निश्चित केल्यानंतर त्याला विरोध करीत तिने 14 डिसेंबर रोजी घरातून पलायन केले. त्यानंतर सोमवारी ती रामानंदनगर पोलिस ठाण्यात हजर होऊन तिने सर्व हकिगत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या पालकांना बोलवून त्यांची समजूत घातली. दरम्यान पालकांनी तिची वैद्यकीय तपासणी शिवाय घेण्यास नकार दिला. तिच्या तपासण्या सुरू असल्याने मंगळवारीही ती अल्पवयीन मुलगी जिल्हा सामान्य रुग्णालयातच होती.

समतानगरात एक भाजीपाला विक्रेत्याने त्याच्या 14 वर्षीय मुलीचे लग्न लावण्याचा हट्ट धरला होता. त्याला विरोध करीत मुलगी घरातून निघून गेली होती. सोमवारी परत आल्यानंतर तिच्या पालकांनी तिला वैद्यकीय तपासणी शिवाय ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच त्या मुलीनेही पालकांच्या सोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे तिला सिव्हीलमध्ये दाखल केले. मात्र काही तपासण्या अजून अपूर्ण असल्याने मंळवारीही तिला सिव्हीलमध्येच ठेवावे लागले. बुधवारी तिचे तपासणी अहवाल मिळाल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाणार आहे.

प्रेमसंबंध असल्याचे आले समोर
अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी रामानंद पोलीसात तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी मुलीविषयी माहिती घेतली. यानंतर मुलगी एका महिलेच्या संपर्कात असल्याचे मुलीच्या वडीलांनी पोलीसांनी सांगितले. पोलीसांनी त्या महिलेस ताब्यात घेत चौकशीसाठी बालविले. चौकशीत महिलेने त्या मुलीचे एका मुलाशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. यातच पोलीसांनी माहितीच्या आधारावर त्या मुलीच्या प्रियकराला ताब्यात घेऊन मुलीविषयी माहिती घेतल्यानंतर अल्पवयीन मुलगी ही पाळधी येथे असल्याचे सांगितले. मात्र, आपले प्रेमसंबंध असल्याचे पालकांना कळाल्याची भनक लागल्याचे कळताच मुलीने रामानंद पोलीस स्टेशन गाठत पालकांवरच उलटवार करत लग्नासाठी हे जबरदस्ती करत असल्याचे सांगितले. व प्रियकारासोबतच लग्न करणार असा हट्ट धरला होता. अशा माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.