रावेर। येथील पूर्वा पाटील यांनी नुकतेच वैद्यकीय क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केले आहे. त्या पुणे येथील डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून नाक, कान, घसा या विशेष अभ्यासक्रमात पदव्युत्तर शल्यचिकीत्सक म्हणून उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या डॉ. चंद्रदीप पाटील यांच्या पत्नी आहे.
या यशाबद्दल पी.आर.पाटील, अरविंद पाटील, जे.के.पाटील, डॉ.चंद्रकांत अग्रवाल, डॉ.दत्तप्रसाद दलाल, डॉ. मीनल दलाल, डॉ.योगेश पाटील, डॉ. गुलाबराव पाटील, डॉ.डीगंबर पाटील यांनी अभिनंदन केले.