रावेर । आधुनिक शेती, गरजुंसाठी शिक्षण व वैद्यकीय सेवा देणारे तसेच सामाजिक कार्यात सदैव तत्पर राहणारे डॉ. प्रविण चौधरी व त्यांच्या पत्नी डॉ. चैताली चौधरी यांच्या सेवा कार्याची दखल घेत त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. विटवा येथील रहीवासी डॉ. चौधरी यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊन गोरगरीबांची सेवा करण्यासाठी रावेर शहरात आले. त्यांना वैद्यकीय सेवेसह शेती, शिक्षण, सामाजिक कार्याची आवड आहे. पत्नी डॉ. चैताली चौधरी या देखील खांद्याला-खांदा लावून सेवा करीत आहे. डॉ. चौधरी यांनी यापूर्वी मुलांसाठी व गर्भवती महिलांसाठी मोफत वैद्यकीय शिबिर घेतले आहे. ते गुर्जर स्नेहवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या याच कामाची दखल तालुकावासियांनी घेतली आहे.