वैद्यनाथप्रकरणी सदोष मनुष्यवधा गुन्हा दाखल करा

0

धनंजय मुंडे यांची मागणी

बीड : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाची टाकी फुटुन झालेली दुर्लघटना अतिशय दुर्देवी आहे. घटनेत पाच व्यक्तींचा मृत्यु होऊनही अद्याप साधा गुन्हा ही दाखल झालेला नाही. या घटनेस कारखाना प्रशासन जबाबदार असल्याने या प्रकरणी सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान विरोधी पक्षनेतेधनंजय मुंडे यांनी केली. घटनेचे आपल्याला राजकारण करायचे नाही मात्र ज्या पध्दतीने आपल्याला रोखण्याचा प्रयत्न झाला ते पाहता कारखाना प्रशासनच या घटनेत जबाबदार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

10 लाख रूपयांची मदत द्यावी
मुंडे यांनी रविवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कारखाना प्रशासनाच्या दबावाखाली येऊन पोलिस प्रशासनाने मुंडे यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावर लोकप्रतिनिधींना घटनास्थळी जाऊ न देण्याचा हा प्रकार पोलिस मंत्र्यांच्या दबावाखाली करीत असून या प्रकरणी सभागृहात आवाज उठवू असे मुंडे म्हणाले. या घटनेत मृत्यु झालेल्या लिंबोटा, देशमुख टाकळी, गाढे पिंपळगावं येथील कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवुन त्यांनी त्यांचे सांत्वन केले. घटनेत मृत झालेले कर्मचारी हे घरातील प्रमुख असल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. या कुटूंबियांना ताताडीने 10 लाख रूपयांची मदत द्यावी तसेच जखमींना 5 लाख रूपये मदत देण्याची मागणी ही त्यांनी केली.