नवी सांगवी : पिंपळे गुरव येथे वाल्मिक समाज (ब्रिगेड) पंचायतीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण चव्हाण यांची पिंपळे गुरव परिसर वॉर्ड अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीस वाल्मिक समाज पंचायतीचे माजी अध्यक्ष रतन झंडा, विजय जाधव, दिपक चव्हाण, पोपट बिवाल, भगतराम देदुंडा, राजेश सुनगत, लक्ष्मण चव्हाण, उपाध्यक्ष संतोष चव्हाण आदींसह पंचायतीचे सर्व पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते. या बैठकीत पंचायतच्या पिंपळे गुरवमधील कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्यकारिणीमध्ये सुभाष भेनवाल-कार्याध्यक्ष, संतोष भिडलान-सहसचिव, अनिल गोहिरे, योगेश सारसर, राकेश चव्हाण, दिनेश अठवाल, राजु सेनानी आदींचा समावेश आहे. दरम्यान यावेळी पंचायतीचे माजी अध्यक्ष रतन झंडा व अन्य पदाधिकार्यांच्या हस्ते नवनिर्वाचित वॉर्ड अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.