वोक्हार्टचा अवयवदानाच्या जागृतीबाबत पुढाकार

0

जळगाव। आरोग्य सेवेबाबत नेहमीच पुढाकार घेणार्‍या वोक्हार्ट हॉस्पिटलने अवयव प्रत्यारोपण या क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून अवयवदानातून जागृती पुढाकार घेतला आहे. किडनी प्रत्यारोपन व डायलिसीसबाबत येथे उपलब्ध असलेल्या उपचारांनी रुग्णास दिलासा मिळाला असल्याचे केंद्रप्रमुख विनोद सावंतवाडकर यांनी सांगितले.

हेल्पलाईनसह 24 तास मार्गदर्शन उपलब्ध
येथील नेफ्रोलोजीस्ट डॉ. नागेश अघोर यांचा मार्गदर्शनाखाली वोक्हार्ट मध्ये आजपर्यंत 34 किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले असून सुमारे 75000 डायलिसीसही करण्यात आले आहेत. किडनी दिवस निमित्त वोक्हार्टचे सर्व डॉक्टर्स व कर्मचारी यांनी अवयवदानाचा संकल्प केला. येत्या काळात सुमारे 1000 नागरिकांकडून अवयवदानासाठी स्वेच्छापत्र देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नेफ्रोलोजीस्ट डॉ. नागेश अघोर म्हणाले की, 65 ते 74 या वयोगटातील स्त्री पुरुषांना किडनीचे आजार होण्याची अधिक शक्यता असते, सोबत हृदयविकार व पक्षाताचाही धोका संभवतो त्यामुळे ज्यांना डायबेटीस व रक्तदाबाचा त्रास आहे, अशांनी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. या मोहिमेचा भाग म्हणून अनेक उपक्रम अवयदानाकरीता मार्गदर्शनपर व्याख्याने, हॉस्पिटलमधील डायलिसीस, किडकी प्रत्यारोपण,अवयवदानासाठी 24तास मार्गदर्शकाची उपलब्धता व हेल्पलाईन क्र. 08600959444 याबाबत माहिती केंद्रप्रमुख सावंतवाडकर यांनी दिली.