पिंपरी-मिनरल वॉटरचा व्यवसाय सुरू करण्याच्या नावाखाली एका व्यापा-याला ४६ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पिंपरी कॅम्पात समोर आला आहे. या प्रकरणी गंडविणा-या इसमाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद मोटवाणी यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जीवत प्रेमचंद नागराणी याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागराणी याने डिसेंबर २०१५ मध्ये मोटवाणी यांच्याकडून आर्थिक अडचणीमुळे १० लाख रुपये घेतले होते. त्यानंतर जानेवारी २०१६ मध्ये मिनरल वॉटर व सॉफ्ट डिक्सचा व्यवसाय सुरू करण्यासाठी २५ लाख रुपये लागणार आहेत. त्यासाठी फेब्रुवारी २०१६ मध्ये पुन्हा १९ लाख ५० हजार रुपये मोटवाणी यांच्याकडून घेतले. मात्र, ही रक्कम दुस-या व्यवसायात कमवून त्यातून नफा मिळविला. असे एकूण ४६ लाख रुपये परत करणे अपेक्षित असताना नागराणी याने ते परत न करता फसवणूक केली. त्याबाबत मोटवाणी यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.