मुक्ताईनगर । तरुणांनी व्यवसाय व शेतीची कास धरुन यशाच्या शिखरावर मार्गक्रमण करावे असा मार्मिक सल्ला देत त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन तथा व्यवसायात येणार्या अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करेल असे प्रतिपादन उद्योजक डी.डी. बच्छाव यांनी केले. तसेच त्यांनी भुमिपुत्र मराठा समाज संस्थेच्या माध्यमातुन सुरु असलेल्या समाज कार्याची प्रशंसा केली. निमित्त होते मराठा सेवा संघ व भुमिपुत्र मराठा समाज संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन तसेच भुमिपुत्र मराठा समाज संस्था आणि मराठा मंगल विवाह संस्था, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वधु वर सूचक नोंदणीचा शुभारंभ भुसावळ रोडवरील रामरहीम चेंबर्स मध्ये करण्यात आला. त्यानंतर भुमिपुत्र मराठा समाज संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
विविध समित्यांवर केली पदाधिकार्यांची नियुक्ती
प्रसंगी भुमिपुत्र मराठा समाज संस्थेची धर्मदाय खात्यांर्गत रजिस्टर्ड नोंदणी झाल्याची माहिती उपस्थित मान्यवरांना देण्यात आली व संस्थेंतर्गत मराठा समाज वधु वर सूचक नोंदणी समिती अध्यक्षपदी अॅड. श्रीकृष्ण दुट्टे, व्यवसाय समिती अध्यक्षपदी संतोष मराठे, महीला समिती अध्यक्षपदी पल्लवी पाटील, कामगार समिती अध्यक्षपदी भागवत कोरडे, विद्यार्थी व विद्यार्थिनी सुचक समिती अध्यक्षपदी प्रभारी म्हणुन मंगेश काटे, वकील समिती अध्यक्षपदी अॅड. देविदास काळे, वैद्यकीय समिती अध्यक्षपदी डॉ. शिवाजी चौधरी, न्याय पंचायत अध्यक्षपदी अनंतराव देशमुख अशा प्रकारे समित्या स्थापन करून सदर पदाधिकार्यांवर समाज कार्याच्या जबाबदार्या देण्यात आल्या. अध्यक्षस्थानी डी. डी बच्छाव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून यु.डी. पाटील, राम पवार, अनंतराव देशमुख, निवृत्ती पाटील, विलास धायडे, डॉ.बी.सी महाजन, ईश्वर रहाणे, आर.व्ही पाटील, सयाजीराव घोगरे, भगवान घोगरे, योगेश पाटील, दिनेश कदम, विनोद सोनवणे, डॉ. शिवाजी चौधरी, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. अशोक पाटील, अॅड. अनिल पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी भुमिपुत्र मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष दिनेश कदम, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप पाटील व संचालक तसेच विकी मराठे, सचीन पाटील, छबीलदास पाटील, रामदास पाटील, चंद्रकांत विटकरे, योगेश पाटील आदिंनी परीश्रम घेतले.