व्यवसाय करून राजकारणात आलो, राजकारणाचा व्यवसाय केला नाही

0

मंत्री सुभाष देशमुखांचे भावनिक आवाहन; देशमुख आणि जयंत पाटील यांचे एकमेकांना आव्हान

मुंबई :- राज्य शासनाकडून कोणी किती लाभ घेतला आहे याची खुली चौकशी कऱण्याचे आव्हान राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना दिले आहे. जयंत पाटील यांनी सुभाष देशमुख यांच्यावर आरोप केले होते. जयंत पाटील यांच्या आरोपाला उत्तर देतांना जयंत पाटील यांना थेट आव्हानच दिले आहेत. सुभाष देशमुख यांनी महापालिकेच्या जागेवर बेकायदा घर बांधल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला होता. जयंत पाटलांच्या आरोपाला उत्तर देतांना सुभाष देशमुख यांना जयंत पाटील यांना थेट आव्हान दिले. जयंत पाटील यांनी शासनाकडून जेवढा लक्ष घेतला आहे तो सर्व परत करावा आणि मी शासनाकडून जेवढा लाभ घेतला आहे तो सर्व परत करण्यास तयार आहे. मी आत्तापर्यंत शासनाचा कोणताही लाभ घेतलेला नाही तर उलट जयंत पाटील यांनी शासनाचा मागील अनेक वर्षात किती लाभ घेतलेला आहे याची चौकशी करावी असे आव्हान सुभाष देशमुख यांनी केले. सुभाष देशमुख यांनी केलेल्या अव्हानाचा स्विकार जयंत पाटील यांनी केला आणि चौकशी होऊन जाऊ द्या असे सांगितले.

अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करत असतांना सुभाष देशमुख यांनी सभागृहाला उत्तर दिले. यावेळी बोलतांना सुभाष देशमुख म्हणाले की, मी राजकारणात यायच्या आगोदर व्यवसाय केलेला आहे. व्यवसायामध्ये आगोदर यशस्वी झालो आणि नंतर राजकारणात आलेलो आहे. आगोदर व्यवसाय केला आणि नंतर राजकारणात आलो इतरासारखे राजकारणातून व्यवसाय केला नसल्याचे सांगत विनाकारण आरोप करू नका असे सुभाष देशमुख यांनी सांगितले. सोलापूर शहरातील होटगी रोड वरील जे घर बांधलेले आहे ते घर गुंठेवारीच्या नियमाला अधिन राहून बांधलेले आहे. महापालिकिकेने बांधकाम परवाना देखील दिलेला आहे. मात्र फक्त सुडाचे राजकारण करणाऱ्या विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला असल्याचा आरोप सुभाष देशमुख यांनी केला आहे.

वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या लोकांना भाजपाच्या कार्य़कर्त्यांना नाहक त्रास देण्याचे काम आत्तापर्यंत केलेले आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांचा उस न्यायचा नाही, दुध न्यायचे नाही, शेतीसाठी कर्ज द्यायचे नाही असे सुडाचे राजकारण या लोकांनी केलेले आहे. त्यामुळेच मी स्वतःच्या कर्तत्वावर लोकमंगल बॅंकेची स्थापना केली आणि साखर उद्योग उभा केलेला आहे. माझ्या कोणत्याही कारभाराची कोणतीही चौकशी करायला मी तयार असल्याचे सांगत एखाद्या यशस्वी व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप सुभाष देशमुख यांनी केला आहे.