पिंपरी : बार्टी व चिंचवड येथील नालंदा वाचनालयाच्या वतीने ‘अष्टपैलू डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर राज्यस्तरीय व्याख्यानमाला स्पर्धेचे आयोजन 11 ते 13 एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे. संत तुकारामनगर येथील कै. मंगलसेन बहल विरंगुळा केंद्र येथे होणार्या या स्पर्धेमध्ये सर्वांसाठी सहभाग खुला आहे. यासाठी पहिल्या दिवशीचे विषय : घटनाकार डॉ. आंबेडकर, अस्पृश्यता निवारक डॉ. आंबेडकर, स्त्रियांचे कैवारी डॉ. आंबेडकर. 12 रोजी बौद्ध धम्मप्रवर्तक डॉ. आंबेडकर, उत्तम लेखक व पत्रकार डॉ. आंबेडकर तर 13 रोजी अर्थतज्ज्ञ डॉ. आंबेडकर आणि मंत्री म्हणून बाबासाहेबांचे कार्य हे विषय असतील. सादरीकरणाचा कालावधी किमान 7 ते कमाल 10 मिनिटे असेल. नावनोंदणीसाठी जगन्नाथ नेरकर यांच्याशी 9921426700 या क्रमांकावर संपर्काचे आवाहन आयोजकांनी केले आहे.