व्याख्यानमालेतून विद्यार्थी, पालक व सर्वसामान्य वर्गांत विचारांचे आदानप्रदान

0

शहादा । येथील कै. विश्राम काका संकुलात सायंकाळी तीन दिवसीय व्याख्यान मालेचे उद्घाटन करण्यात आले. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मदनलाल मिश्रा व प्रसिध्द गझलकार प्रदीप निफाडकर यांनी गुंफले. गेल्या सहा वर्षापासून ही परंपरा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. विश्राम काका यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजीत केली जातें. तीन दिवस चालणार्‍या या कार्यक्रमात विविध वक्ते तथा साहित्यीक व कवी यांच्या माध्यमातून शहादेकराना बौद्धिक मेजवानी मिळते. सायंकाळी माध्यमिक शिक्षणाधिकारी नंदुरबार तसेच सस्थेचे अध्यक्ष वनश्री मोतीलाल पाटील , सस्थेचे सचिव प्रा ए. के. पाटील , हिरालाल पाटील व कार्यक्रमाचे वक्ते मदनलाल मिश्रा व प्रदीप निफाडकर यांच्या उपस्थित उद्घाटन सोहळा पार पडला.

शहादेकरांचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान
पहिले पुष्प गुंफताना मदन मिश्रा यांनी अगदी संवेदनशील विषयाला हात घातला. सामाजिक बांधिलकी शहादेकरांसाठी नवीन नाही. पारतंत्र्याच्या काळापासुन तर अगदी आणीबाणीच्या वेळी देखील शहादेकरानी सामाजिक बांधिलकी जपुन ठेवली आहे. स्वातंत्र्य चळवळीचा संग्रामात शहाद्यातुन एकूण 26 गावातील 96 लोकानी सहभाग नोंदविला होता. यात सर्व जातीतील लोंकाचा सहभाग होता असे सांगितले.

संस्थेचे कार्य प्रेरणादायी
यावेळी डॉ. राहुल चौधरी म्हणाले की, संस्थेचे या शहादा शहरावर फार प्रेम आहे अश्या व्याख्यान मालेचा माध्यमातून संस्थेचा एकच उद्दात हेतु दिसुन येतो तो म्हणजे येणारे विद्यार्थी पालक व सर्व सामान्य वर्गात विचारांची देवान घेवाण व्हावी. शुद्ध विचारांची स्पंदने रुजावी. सस्थेंने फार चांगले चांगले विद्यार्थी घडविले आहेत. बर्‍याच लोकांचा संसार उभारण्यास संस्थेंचे मोठे योगदान आहे. परिसरातला संवेदनशील घटक म्हणून मी कार्यरत आहे. संस्थेची ही परंपरा सातत्याने सुरु रहावो अश्या
शुभेच्छा दिल्यात.

गझल गायनाने रसिक मंत्रमुग्ध
सामाजिक बांधिलकी ज्यांचा रक्तात आहे ती कायम रुजविणे महत्त्वाचे आहे. सामाजिक बांधिलकी रुजविताना देश समर्पण भावना आपल्या मातीशी नाळ जुळणे ,खरा व समर्पक इतिहास हा आजचा पिढीपुढे मांडणे. भारताची संस्कृती अबाधीत राखणे आजच्या पिढीपुढे मांडणे म्हणजे सामाजिक बांधिलकी होय. प्रदिप निफाडकर यांनी मार्गदर्शन केले. नंतर त्यांनी गझल सादर केली. सूत्रसंचालन व आभार संजय भोई यांनी मानले.