व्यापार्‍यांना डांबून ठेवत खंडणी मागणारी चाळीसगावची टोळी जेरबंद

0

दिल्ली क्राईम ब्रांचच्या पथकाने तिघांच्या आवळल्या आवळल्या

चाळीसगाव- चाळीसगाव शहरातील कन्नड रोडवरील धाब्यावर थांबलेल्या गाड्यांमधुन माल उतरवुन व्यापार्‍यांना कमी भावाचे आमीष दाखवुन त्यांना औरंगाबाद येथे विमानाने आल्यावर त्यांना सोबत घेत डांबुन ठेवुन खंडणी उकळणा-या टोळीचा पर्दाफाश दिल्ली क्राईम ब्रांच च्या पोलीसांनी केला असुन चाळीसगाव शहरातील एक व तालुक्यातील शिंदी येथील 2 अशा तिघा जणांच्या टोळीला अटक करुन दिल्ली येथे घेवून गेले आहेत. या घटनेने चाळीसगाव येथे खळबळ उडाली आहे.

ट्रांझीट रीमांड घेवून आरोपींना नेले दिल्लीला
8 रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिल्ली क्राईम ब्रांचचे उपनिरीक्षक अरविंद कुमार, लोकेश कुमार व त्यांच्या सोबत असलेले 10 पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांच्या खाजगी वाहनात येवून चाळीसगाव शहरातील आरोपी जितेंद्र बाबुराव पाटील (46, रा.गणेश रोड, चाळीसगाव), निलेश अनिल चव्हाण (24), ज्ञानेश्वर रतन ठाकरे (41, दोघे रा.शिंदी, ता.चाळीसगाव) यांना ताब्यात घेतल्याची नोंद केली तसेच चाळीसगाव न्यायालयात संशयीतांना दिल्ली नेण्यासाठी ट्राझीट रिमांड घेतला.

व्यापार्‍यांना खंडणी मागणे भोवले
दिल्ली पोलीसांकडुन माहिती जाणुन घेतली असता वरील आरोपी पैकी जितेंद्र बाबुराव पाटील याचा कन्नड रोडवर जेवणाचा ढाबा (हॉटेल) आहे त्याच्या धाब्यावर जेवणासाठी लांब पल्ल्याची विविध माल भरलेली वाहने थांबवुन चालक जेवणासाठी थांबत असत याचा फायदा घेवुन आरोपी जितेंद्र पाटील, निलेश चव्हाण, ज्ञानेश्वर ठाकरे हे त्या वाहनांमधील किमती वस्तु काढुन त्या वस्तु दिल्ली व परराज्यातील व्यापार्‍यांना कमी किमतीत देण्याचे आमीष दाखवुन त्यांना माल घेण्यासाठी चाळीसगाव येथे येण्यास भाग पाडत ते व्यापारी चाळीसगाव येण्यासाठी विमानाने औरंगाबाद येथे आल्यावर आरोपी त्यांना सोबत घेवुन डांबुन ठेवत त्यांच्या कडुन खंडणी मागत होते तर फोन करुन खंडणीचे पैसे वसुल करीत असल्याचे समजले अशाच प्रकारे दिल्ली येथील एका व्यापार्‍याला त्यांनी बोलावुन घेतले व औरंगाबाद येथुन घेवुन त्यास करमाड येथे डांबुन ठेवले व त्याला बंदुकीचा धाक दाखवून फोनवरुन 10 लाखाची खंडणी त्याच्या माणसाकरवी मागुन त्याला सोडण्यात आले त्या व्यापार्‍याने दिल्ली गाठुन आपबिती दिल्ली पोलीसांना सांगीतल्यावर दिल्ली पोलीसात 14 मार्च 2018 रोजी वरील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासुन दिल्ली क्राईम ब्रांच पोलीस आरोपींच्या शोधार्थ होती. आरोपींची माहिती मिळाल्यावर वरील दिल्ली क्राईम ब्रांच चे पथक चाळीसगाव येथे त्यांच्या खाजगी वाहनातुन दाखल झाले व दिनांक 7 जुलै 2018 रोजी आरोपी जितेंद्र पाटील व ज्ञानेश्वर ठाकरे यांना अटक केली तर दिनांक 8 जुलै 2018 रोजी आरोपी निलेश चव्हाण यास अटक करुन त्यांना चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आणुन पोलीस डायरीला नोंद करुन न्यायालयात हजर केले व त्यांना दिल्ली येथे घेवुन जाण्यासाठी त्यांची ट्रांजीट रिमांड घेवुन त्यांना दिल्ली येथे नेण्यात आले आहे.