जबलपूर: खुनाच्या गुन्हातील आरोपी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, व्वा! क्या शान है असे म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर वैयक्तिक टीका केली. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील जाहीर सभेमध्ये बोलताना राहुल गांधींनी अमित शहांवर निशाना साधला.
अमित शाहंना त्यांनी मुलाच्या संपत्तीत झालेल्या वाढीवरुनही लक्ष्य केले. तुम्ही जय शाहचे नाव ऐकले आहे का? तो जादूगर आहे. तीन महिन्यात त्याने ५० हजार रुपयांचे ८० कोटी रुपये केले असे राहुल गांधी म्हणाले. नरेंद्र मोदींनाही त्यांनी लक्ष्य केले. नरेंद्र मोदी म्हणतात न्याय योजनेसाठी पैसे कुठून येणार? अदानी आणि अंबानींकडून मी काढून देणार. आम्ही सत्तेत आलो तर राफेल डीलचीही चौकशी करु असे राहुल म्हणाले.