जळगाव । विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शुक्रवारी 2 रोजी ‘व्हाईट कलर डे’ आणि ‘शाडू माती प्रकल्प’ घेण्यात आला. विद्यार्थ्यांची रंग संकल्पना स्पष्ट होण्यासाठी त्यांना ‘पांढर्या रंगाच्या वस्तू दाखवण्यात आल्या. दुध, दही, ताक, तांदूळ, पोहे, मीठ, साबुदाणा अशा पांढर्या रंगाच्या विविध जीवनावश्यक वस्तू दाखवण्यात आल्या. विद्यार्थी व शिक्षक व शिक्षिकांनी पांढर्या रंगाचे कपडे व साडी घालून आले होते. जयमाला चौधरी यांनी ‘व्हाईट कलर डे’ संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.
याच दिवशी ‘शाडू माती प्रकल्प’ सुद्धा घेण्यात आला. रोजच्या अभ्यासापासून विद्यार्थ्यांना थोडा विरंगुळा मिळावा त्यांना शाळेची गोडी लागावी. हात व बोटाचे स्नायू बळकट व्हावेत व लिखाणपूर्व तयारी व्हावी, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच टी.व्ही. व मोबाईलच्या जास्त संपर्कामुळे मुलांचा मातीशी दुरावत चाललेला संबंध दूर होऊन त्यांना वस्तू स्वनिर्मितीचा आनंद मिळावा अशी अनेक उद्दिष्ट समोर ठेवून ‘शाडू माती प्रकल्पाचे’ आयोजन करण्यात आले होते.