पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने प्रभाग क्रमांक 20 मधील शंकरवाडी, शेल पेट्रोलपंपाजवळील 12 मीटर रुंदीच्या व 910 मीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमास ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसदस्य शाम लांडे, रवी लांडगे, नगरसदस्या सुजाता पालांडे, आशा धायगुडे शेंडगे, सुलक्षणा धर, प्रभागाचे नामनिर्देशित सदस्य कुणाल लांडगे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, कार्यकारी अभियंता संजय घुबे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. शंकरवाडी नाल्यापासून ते जे.जे ग्लास कंपनी रेल्वे क्रॉसिंगपर्यंत रेल्वेच्या कडेने जाणारा 12 मीटर रुंद डी.पी रस्ता विकसित करणेत येणार आहे. त्या कामासाठी सुमारे चार कोटी अठरा लाख रुपये खर्च येणार आहे. या रस्त्यामुळे कासारवाडीकडून पिंपरीगावाकडे जाण्याची सुलभ व्यवस्था होणार आहे.