मुंबई : अॅडल्ट चित्रपटांची अभिनेत्री शकीला हिच्या जीवनावर आधारीत बायोपिक येत आहे. या बीओपीक मध्ये शकीलाची भूमिकेत अभिनेत्री रिचा चड्ढा दिसणार आहे. याआधी रिचाचा लूक समोर आला होता. त्यानंतर आता या सिनेमातील तिचा आणखीन एक लूक समोर आला आहे.
शकीलाची भूमिका साकारताना आलेल्या अनुभवांबद्दल रिचाने सांगितले की, मी शकीला बायोपिकमध्ये काम करताना खूप एन्जॉय केले आहे. हा सिनेमा मी आतापर्यंत केलेल्या सिनेमांपेक्षा वेगळा आहे. त्यांच्या जीवनात आलेले चढउतार सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहेत. ज्या गोष्टी सांगायच्या आहेत, त्या सर्व गोष्टींचा समावेश सिनेमात करण्यात आला आहे. सर्व गोष्टी लपवून चित्रपट बनवण्यात काय अर्थ आहे. या चित्रपटात शकीला देखील दिसणार आहेत. त्या केमिओ करणार आहेत. दिग्दर्शक लंकेशने नंतर शकीला यांना चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला.