मुंबई : ‘बिग बॉस सीजन १२’ या रिअॅलिटी शोमध्ये सर्वात अनोखी जोडी म्हणजे अनुप जलोटा आणि जसलीन मथारुची. या जोडीला अनोखी जोडी म्हणायचं कारण म्हणजे, या दोघांच्या वयातील अंतर. जसलींन माथारू ही २७ वर्षीय तर अनुप जलोटा ६५ वर्षांचे आहे. बिग बॉस १२च्या पहिल्या एपिसोड मध्ये या दोघांनी आपल्या रेलशनची कबुली दिली होती. तसेच हे दोघे तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचेही सांगितले.
आता हीच कथा प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावरही पाहायला मिळणार आहे. ‘जर्नी ऑफ कर्मा’ असे चित्रपटाचे नाव असून याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. शक्ती कपूर आणि पूनम पांडे हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आगामी चित्रपट अनुप जलोटा यांच्या लव्हलाईफवर आधारित असणार असल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वीच शक्ती कपूर यांनी केला होता. आपल्या मुलीच्या म्हणजेच श्रद्धाच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत शक्ती कपूर या चित्रपटात रोमान्स करताना दिसणार आहे.या चित्रपटाबद्दल बोलत असताना शक्ती कपूर यांनी म्हटलं होतं की, प्रेमाला वयाचे बंधन नसते.