शत्रुघ्न सिन्हांवर भाजपाकडून कारवाईचे संकेत

0

नवी दिल्ली : कोलकाता येथे विरोधकांच्या रॅलीमध्ये शनिवारी अभिनेते आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी, खरं बोलणं ही जर बंडखोरी असेल तरमी बंडखोर आहे असं म्हणत पंतप्रधान मोदीं विरोधात आणि भाजपाविरोधात जोरदार टीका केली होती. सिन्हा गेल्या काही वर्षांपासून भाजपाच्या पक्षनेतृत्वावर सातत्याने टीका करत आहेत. पण आता भाजपाने पहिल्यांदाच सिन्हा यांच्या विधानांची गंभीर दखल घेतली असून लवकरच त्यांचं पक्षातून निलंबन केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी थेट पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे, त्यांनी त्यांची पातळी ओलांडली असून सिन्हा हे संधीसाधू आहेत’, अशी टीका भाजपाचे प्रवक्ता राजीव प्रताप रूडी यांनी केलीय. ‘सिन्हा खासदार असल्याचे फायदे घेऊ इच्छितात. म्हणूनच पक्षाने व्हीप जारी केल्यावर ते संसदेत हजर राहतात. पण, इतर पक्षांच्या व्यासपीठावर जाऊन सरकारवर टीका करतात. ते संधीसाधू आहेत. पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल’ असा विश्वास असल्याचे रुडी यांनी म्हंटले आहे. यावेळी प्रथमच भाजपा प्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांच्या विधानांमुळे सिन्हा यांच्यावर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.