नवी दिल्ली-गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेले शत्रुघ्न सिन्हा आगामी काळात २०१९ मध्ये होणाऱ्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढविण्याचे शक्यता आहे. शत्रुघ्न सिन्हा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातच निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी लखनौला जयप्रकाश नारायण यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत असतांना त्यांनी मोदी व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.