भुसावळ । श्री शनिदेवाच्या जयंतीदिनी येथील जामनेर रोडलगत असलेल्या श्री शनिदेव मंदिरामध्ये गुरूवार 25 रोजी भाविकांनी सकाळपासून मंदिराबाहेर दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी शनी देवाला गोडेतेलाचा अभिषेक घातला.
विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात
वैशाख वद्य अमावस्येला शनैश्वर जयंतीचे औचित्य साधून शनिमंदीरात पहाटे मूर्तींचा अभिषेक करण्यात आला. मंदीराचे पुजारी अर्जुन जोशी, भुपेंद्र जोशी व महेश जोशी यांनी विधीवत पूजन केले. साडेसाती व संकट निवारण होण्यासाठी पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. अभिषेक, महाआरती, हवन, अनुष्ठान, महाप्रसाद वितरण आदी कार्यक्रम पार पडले. सायंकाळी महाआरती झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुजारी अर्जुन जोशी, भुपेंद्र जोशी व महेश जोशी यांनी परिश्रम घेतले.