शनिपेठ, एमआरडीसी पोलीसांचे कोम्बिंग ऑपरेशन

0

जळगाव । शनिपेठ व कांचन नगर परिसरात शनिपेठ पोलीसांच्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन आरोपी संशयीत रित्या हालचाली करत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांची चौकशी केली असता तिघांकडे प्रत्येकी एक चॉपर तर एकाकडे 5 हजार 300 रूपयांचे देशी विदेशी दारूचा साठा आढळून आल्याने तिघांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आणि तिघांच्या विरोधात शनिपेठ पोलीसात अर्म अ‍ॅक्टनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

गावठी पिस्तूल बाळगणार्‍यास अटक
एमआयडीसी पोलीसांनी रात्री 11 वाजेच्या सुमारास पो.नि. आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलआऊट ऑपरेशननुसार पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोहेकॉ दिनकर खैरनार, सचिन मुंडे, पोका किशोर पाटील या पथकांना गुन्ह्यातील फरारी आरोपी शोधार्थ गेले असता फरार आरोपी व हिस्ट्रीशिटर सिंगापूर कंजरवाडा भागात राऊंड घेत असतांना यावेळी गुप्त माहितीनुसार आरोपी अनिल पुनमचंद राठोड (रा. आंबेवडगाव ता.पाचोरा) हा मासूमवाडीच्या पुलावर कासमवाडीकडे जाणार्‍या रोडवर कमरेला गावठी बनावटीचे पिस्टल लावून फिरत असल्याचे कळाल्यानंतर त्याला रस्त्याने आडवून तपासणी केली असता त्यांच्याकडून 10 हजार रूपये किंमतीचा एक लोखंडी बनावटीचा पिस्टल अवैधरित्या मिळून आला. एमआयडीसी पोलीसात अर्म्ड अ‍ॅक्टनुसार आरोपी अनिल राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर पिस्टलसह आरोपीस ताब्यात घेतले आहे.

तिघांकडून तिन चॉपर जप्त
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक प्रविण वाडिले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन बेंद्रे, पोउनि सुरेश सपकाळे, पोहेकॉ रविंद्र पवार, पोहेकॉ दिनेशसिंग पाटील, पोना दिपक बनसोडे, पोना अनिल धांडे, पोकॉ सैंदाणे, पोकॉ गणेश गव्हाळे, गजानन बडगुजर, नितीन बाविस्कर, मपोकॉ मनिषा पाटील, मपोकॉ सुनिता इंधाटे, पोका बनसोडे व देशमुख यांनी शनिपेठ परीसर व पोलीस स्टेशन हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. गुरूनानक नगर, कांचन नगर, वाल्मिक नगर, आसोदा रोड अशा भागात पोलीसांनी पेट्रोलिंग राबविली. कांचन नगर घरकुल भागात रात्री 11.30 वाजता पायी तपासणी करत असतांना आरोपी भगवान सुकदेव सपकाळे (वय-34) रा. कांचन नगर यांच्याकडे 24 सेमी लांबीचे धारदार चॉपर आणि 5 हजार 330 रूपयांचे देशी-विदेशी दारू आढळून आले. तर त्याच भागातील हनूमान मंदीराजवळ राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंखे (वय-23) कांचन नगर याची झडाझडती घेतली असता 13 इंची लांबीचा धारदार चॉपर मिळून आला. गुरूनानक भागात मध्यरात्री 1.50 वाजता नाईट कोम्बिंग करत असतांना आरोपी लखन भगवान सारवान (वय-29) रा. गुरू नानक नगर याच्याघरात 29 सेमीचा चॉपर आढळून आला.

शनिपेठ पोलीसात गुन्हा
शनिपेठ पोलीसांनी राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये झडाझडती घेत असतांना तिघांकडून चॉपर आणि एकाकडून देशी-विदेशी दारू आढळल्याने आरोपी भगवान सुकदेव सपकाळे, राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंखे, लखन भगवान सारवान यांच्या विरोधात भाग 6 गुरनं 34/35/2018 नुसार आर्म अ‍ॅक्ट 4/25 नुसार शनिपेठ पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांवर वचक बसणार आहे.