Unidentified persons set fire to two-wheelers in the city’s potter’s house: house also damaged जळगाव : शनीपेठ परिसरातील कुंभारवाड्यात बंद घरासमोर पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पेटवल्याने खळबळ उडाली आहे.
अज्ञाताने पेटवली दुचाकी
शनिपेठेत माजी महापौर भारती सोनवणे यांच्या घराशेजारील गल्लीत अमीर जावेद खाटीक (वय-40) कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. ते मटण-चिकन विक्रीचा व्यवसाय करुन कुटूंबीयांचा उदनिर्वाह चालवतात. बुधवार 31 ऑगस्ट रोजी रेाजी अमीर खाटीक कुटूंबीयांसह बाहेरगावी मध्यप्रदेशात गेले होते. परिणामी घरी कुणीच नसल्याची संधी साधत मध्यरात्री अडीच-तन वाजेच्या सुमारास देान अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घराबाहेर उभी मोटारसायकल पेटवून दिल्याची घटना घडली. मोटारसायकल पेटवल्याने आगीचा भडका उडून घराचा काही भागही जळाला आहे. या प्रकरणी अमीर खाटीक यांच्या कुटूंबीयांनी आदील ऊर्फ शाहरुख सलीम खाटीक याच्यावर संशय व्यक्त केला असून शनीपेठ पोलिसांकडे तशी तक्रार करण्यात आली.