पिंपरी – जागतिक आरोग्यदिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय रुग्णालयात दि. 7 ते 28 एप्रिल दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रोज सकाळी सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळेत हे शिबिर होणार आहे. यामध्ये दमा, हृदयरोग, श्वसना संदर्भातील विकार, मधुमेह, पोटाचे विकार, मानसिक आजार, मेंदूविकार, मूळव्याध, हर्निया, मुतखडा, व्हेरीकोजवेन्स, अपेंडिक्स, विविध प्रकारच्या गाठी, टॉन्सिल्स, हायड्रोसिल, गुडघेदुखी, सांधेदुखी, मणक्याचे विकार, स्त्रियांचे विकार इत्यादी व्याधींची मोफत तपासणी व डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. शिबिरासाठी येणार्या रुग्णांनी रेशनकार्ड सोबत आणावे. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. राजेश सिंग 9860188406 तसेच 020-27805900 या क्रमांकावर संपर्क साधावा.