शनिवारी गुरुपूजन सोहळा

0

सांगवी । येथील राधानंद संगीत विद्यालय व शकुंतला ढोरे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (दि. 26) औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिरात गुरुपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे तबला वादन, पंडित सुधाकर चव्हाण यांचे शास्त्रीय गायन तसेच तालश्री पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या वर्षीचा तालश्री पुरस्कार ज्येष्ठ तबला वादक पंडित भाई गायतोंडे (ठाणे) यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषद कुंभमेळा, नाशिकचे अध्यक्ष स्वामी सागरानंद महाराज यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मुख्य संयोजक व राधानंद संगीत विद्यालयाचे अध्यक्ष नंदकिशोर ढोरे यांनी दिली.