शनैश्वर देवस्थानाचा कारभारही सरकारच्या हाती

0

मुंबई-कोल्हापूरचे महालक्षी मंदिर आणि शिर्डीतील साई देवस्थानच्या पार्श्वभूमीवर आता देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थाकोल्हापूरचे महालक्षी मंदिर आणि शिर्डीतील साई देवस्थानच्या पार्श्वभूमीवर आता देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनि शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानाचा कारभारही सरकारच्या हाती येणार आहे. त्यासाठी नवा कायदा तयार करण्यात आला असल्याची माहिती आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.

उत्तर सोयी-सुविधा देऊ
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासह भक्तांसाठी उत्तर सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.

श्री क्षेत्र शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था उत्तम व्यवस्थापनासाठी, कल्याणकारी योजना राबवण्यासाठी अधिक व्यापक करण्यात येणार आहे. विधिमंडळात सदस्यांनी केलेल्या सुचनेनुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे. या नव्या विश्वस्त मंडळात अध्यक्ष, कोषपाल आणि ९ सदस्य असणार आहेत. या व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल. सदस्यांसाठी निकषही निश्चित करण्यात आले असून सर्व सदस्य हे महाराष्ट्रातील रहिवासी तसेच शनिभक्त असणे बंधनकारक आहे. श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था (शंगणापूर) अधिनियम २०१८ असे नविन कायद्याचे नाव असेल.

यापूर्वी शनैश्वर देवस्थानावर धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत विश्वस्त मंडळ नेमण्यात आले होते. मात्र, आता राज्यातील प्रसिद्ध देवस्थाने महाक्ष्मी मंदिर देवस्थान, साई देवस्थान, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थानप्रमाणे आता शनैश्वर मंदिर देवस्थानावरही सरकारी अंमल असणार आहे. न असलेल्या शनि शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानाचा कारभारही सरकारच्या हाती येणार आहे. त्यासाठी नवा कायदा तयार करण्यात आला असल्याची माहिती आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.