मुंबई: २८ रोजी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी ‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की’…, असे म्हणत शपथ घेतली. उद्धव ठाकरेंनी शपथ घेण्यापूर्वीच काही नेत्यांची नावे घेण्यात आली होती, राज्यपालांच्या मते हे शपथ ग्रहण समारंभाच्या प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच या शपथ ग्रहण समारंभात सरकारी यंत्रणेला सहभागी करून न घेतल्यानंही राज्यपाल नाराज आहेत. उद्धव ठाकरेंच्या शपथ ग्रहण समारंभादरम्यान मंचावरची व्यवस्था योग्य नव्हती. शपथ ग्रहण समारंभादरम्यान प्रशासनाला मंचावरची व्यवस्था करू दिली नाही. त्यामुळे ही त्यात बऱ्याच त्रुटी होत्या, असंही ते म्हणाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे यासंदर्भात नाराजीही व्यक्त केली आहे. शपथविधीपूर्वीच नेत्यांची नावं घेण्यात आल्यानं राज्यपाल नाराज आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाखोंच्या साक्षीने गुरुवारी महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उपस्थित जनसागराला साष्टांग दंडवत घालत उद्धव ठाकरे यांनी कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली. उद्धव असे नतमस्तक होताना लाखोंची गर्दी त्यांच्या या विनम्रभावाने हेलावून गेली. महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी अत्यंत मोलाची भूमिका बजावणारे दिग्गज नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ते कृतज्ञतापूर्वक भेटले, तेव्हाही टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.