शबरीमाला प्रकरण: माझ्या आजोबांच्या विचाराचे अंमल-राज ठाकरे

0

मुंबई- सगळ्या स्त्रीपुरूषांना मंदिरामध्ये प्रवेश मिळायला हवा, आणि त्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीने उपासना करायचा अधिकार असायला हवा, असे माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे. त्यांच्या पुरोगामी विचारांचा खऱ्या अर्थाने आज अंमल झाला असे ट्विट मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या शबरीमाला मंदिराचे दरवाजे महिलांना उघडे करण्याच्या निकालानंतर ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उस्फूर्तपणे स्वागत केले आहे.