थिरूवनंतपुरम :सर्वोच्च न्यायालयाने महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय दिला आहे. मात्र अद्यापही या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही. दरम्यान आज मासिक पुजेसाठी उघडण्यात आलेल्या सबरीमाला मंदिरामध्ये एका महिलेन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला आतमध्ये जाऊ देण्यात न आल्याने भक्तांनी आंदोलन सुरु केले. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये पत्रकारही जखमी झाला आहे.
सबरीमाला मंदिर सोमवारी दोन दिवसांसाठी उघडण्यात आले होते. मात्र, पहिल्या दिवशी 10 ते 50 वर्षे वयातील एकही महिला मंदिराकडे फिरकली नव्हती. मंदिर आज, मंगळवारी अथाझा पुजेनंतर बंद करण्यात येणार आहे. काही हिंदू संघटनांनी महिला पत्रकारांना दूर ठेवण्याचा फतवा गेल्या आठवडयात काढला होता. या पार्श्वभुमीवर मंदिर परिसरात 5 हजार जवान तैनात करण्यात आले होते.